loader image
[ays_poll id=7]

मनमाडकरांची “गोदावरी” पुन्हा सुरू करा ; अन्यथा जनआंदोलन

May 17, 2023

मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून रेल्वे प्रशासनाने बंद करून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. अनेक निवेदने देऊन शेवटी रेल्वे प्रशासनाने पर्यायी गाडी सुरू केली, सुरुवातीला सी एस टी पर्यंत धावणारी ही गाडी नंतर दादर पर्यंत करण्यात आली. काही महिन्यांनंतर आठवड्यातून तीन दिवस आणि आता तर ही गाडी धुळ्याहून सुरू केल्याने मनमाड हून रोज नाशिक येथे जाणारे चाकरमानी आणि विद्यार्थी यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गाडीत असलेली तोबा गर्दी मुळे रोज प्रवाशांमध्ये वाद होत असून त्यामुळे तिकीट काढूनही येथील चाकरमान्यांना जागा मिळत नसल्याने रोजच भांडणाचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या हाल-अपेष्टांचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशी संघटनेसह लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही गाडी मनमाडहन सोडली जात नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.