loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस बंद केल्याच्या निषेधार्थ मनमाड ला मोर्चा

May 23, 2023


नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड – गोदावरी एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने कोरोणा काळापासून बंद करून नाशिक जिल्ह्यातील प्रवाशी, विद्यार्थी, चाकरमान्यांची हक्काची गाडी बंद केली. अनेक निवेदने देऊन प्रशासन ने पर्यायी गाडी तर उपलब्ध करून तर दिली मात्र काही दिवसांनी दादर पर्यंत आणि तद्नंतर हप्त्यातुन काही दिवस करत नंतर ही गाडी धुळ्याला पळविण्यात आल्याने चाकरमानी व प्रवाशी वर्गात तीव्र नाराजी असून संतप्त प्रवाशांनी शहरातून मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. रेल्वे प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती बांधून आणि हातात निषेध फलक घेवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.यावेळी आंदोलकांच्यावतीने रेल्वे स्थानक प्रबंधक नरेश्वर यादव यांना निवेदन देण्यात आले.

एक लढा हक्काच्या गोदावरी एक्सप्रेससाठी अशी साद घालत आम्ही सर्व मनमाडकरातर्फे मनमाड जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस मनमाडकरांची जिवनवाहीनी बेकायदेशिर रित्या बंद केल्याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी सायंकाळी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी “वाहा रे अच्छे दिन,जनता त्रस्त रेल्वे प्रशासन मस्त,गोदावरी एक्सप्रेसची मागणी पूर्ण करा नाहीतर खूर्चाच्या खाली करा, गोदावरी एक्सप्रेस हक्काची नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही गोदावरी एक्सप्रेस घेतल्याशिवाय राहणार नाही, कोरोना प्रादुर्भाव फक्त गोदावरी एक्सप्रेस वरच, बाकी गाड्या व रेल्वे प्रशासन आहे तोऱ्यावरच अस आशाच्याचे हातात निषेध फलक घेवून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चा सुरुवात झाली.शहरातील विविध मार्गाने मोर्चा मार्गस्थ होवून मनमाड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर समारोप झाला. यावेळी माजी नगरध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, मनसेचे सौ. स्वाती मगर, रिपाईचे गुरुकुमार निकाळे, अॅड. निखील परदेशी आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.मनमाड – मुंबई गोदावरी एक्स्प्रेस पुर्ववत सुरू करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मोर्चात प्रवासी संघटनेचे नरेंद्र खैरे ,राहुल शेजवळ, मुकेश निकाळे ,संदीप व्यवहारे, माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक ,सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अरुण सोनवणे आणि सर्व स्तरातील नागरिक प्रवासी नियमित प्रवास करणारे चाकरमाने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.मनमाड रेल्वे प्रवासी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले होते.
या मतदार संघाचे मंत्री व खासदार डॉ. भारती पवार यांना जिल्हा परिषद सदस्या पासून ते थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मनमाडकरांनी संधी दिलेली आहे.त्यांनी आपले पूर्ण वजन वापरून ही गाडी त्यांनी त्याच वेळेस सुरू करण्याची गरज होती,पण त्यांनीही दाखल घेतली नाही,याचा निषेध करण्यात आला.यावेळी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका करण्यात आली यापुढे मनमाडकर अन्याय सहन करणार नाही गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू व्हावी या मागणीसाठी मनमाडकर पूर्ण शक्तिनिशी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.येत्या पंधरा दिवसात रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेस सुरू करावी, अन्यथा समस्त मनमाडकर तीव्र आंदोलन करतील.याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी ,असा इशाराही यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून दिला.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.