Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पतसंस्थेला दिलेला धनादेश वटला नाही – कर्जदारास दोन महिने कारावास

May 22, 2023

पंधरा हजार रुपायांचा चेक बाऊंस झाल्याप्रकरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदार कल्पना भाऊसाहेब नेमनार यांना न्यायालयाने दोन महिने कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या पतसंस्थेतून दहेगाव (ता. चांदवड) येथील कल्पना नेमनार यांनी वैयक्तिक कारणासाठी १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात कर्जदार यांनी पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी ५० हजार रुपयाचा धनादेश दिला होता. मात्र, दिलेला धनादेश पास न होता बाऊंस झाला. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात उभय बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मनमाडच्या न्यायदंडाधिकारी एस. ए. लोमटे यांनी कर्जदारास दोन महिने कारावास व एक लाख रुपये नुकसानभरपाईची शिक्षा ठोठावली. पतसंस्थेतर्फे अॅड. महेश प्रभाकर पाटील यांनी कामकाज पाहिले. पतसंस्थेचे व्यवस्थापक रामदास दत्तू दुभासे यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

कबड्डी स्पर्धा आटोपून परतणाऱ्या बेपत्ता मुली पालकांच्या स्वाधीन : सुरक्षा रक्षक बलाची कामगिरी

कबड्डी स्पर्धा आटोपून परतणाऱ्या बेपत्ता मुली पालकांच्या स्वाधीन : सुरक्षा रक्षक बलाची कामगिरी

कबड्डीखेळाच्या स्पर्धेसाठी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे स्पर्धा आटोपुन अक्कल कुव्याहून परतीच्या...

read more
चांडवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा उपक्रम ; स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

चांडवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा उपक्रम ; स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचे आवाहन चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ यांचे मार्फत घेण्यात...

read more
लम्पी रोगावर उपाययोजना तसेच कांद्याला क्विंटल मागे २००० रुपये अनुदान मिळावे : नांदगाव तालुका शिवसेनेची मागणी

लम्पी रोगावर उपाययोजना तसेच कांद्याला क्विंटल मागे २००० रुपये अनुदान मिळावे : नांदगाव तालुका शिवसेनेची मागणी

सध्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असून सुस्त पशुवैद्यकीय यंत्रणा चुस्त व दुरुस्त...

read more
अंगारक (मंगळी) संकष्ट चतुर्थी  निमित्त मंगळवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक (मंगळी) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
शिवसेना नेते स्व.राजाभाऊ छाजेड स्मृतीदिन व स्व राजाभाऊ छाजेड तुफान चौक फलकाचे अनावरण

शिवसेना नेते स्व.राजाभाऊ छाजेड स्मृतीदिन व स्व राजाभाऊ छाजेड तुफान चौक फलकाचे अनावरण

मनमाड शहरातील शिवसेनेची बुलंद तोफ, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख, मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]