loader image
[ays_poll id=7]

“इंडिक टेल्स ” व ” हिंदू पोस्ट ” वेबसाईटच्या विरोधात राष्ट्रवादी काँगेस आणि समता परिषदेचे आंदोलन

May 31, 2023


नांदगाव – सोमनाथ घोंगाणे

नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने, महात्मा फुले पुतळ्याचे पुजन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे संदर्भात आंदोलन करून तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले
इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा तीव्र निषेध करणयात आला
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी असे आंदोलकानकडुन आंदोलन छेडण्यात आले .

 

सदर आंदोलना नंतर निवडणूक नायब तहसीलदार चेतन कोनकर साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजुभाऊ पाटील, समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक भाऊ पाटील, मराठा विद्या प्रसारक संचालक अमित भाऊ पाटील, विनोद शेलार,राष्ट्रवादी महीला तालुकाध्यक्ष योगीताताई पाटील,शहराध्यक्ष अरुण पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, दिपक खैरनार,सोपान पवार,विलास राजोळे, पाटील,राजेंद्र लाठे,नारायण पवार, सुगंधा खैरनार,चंद्रकलाबाई बोरसे,अलकाबाई आयनोर,राहुल खैरनार,किसन जगधने,दारासिंग भिडे, बाळासाहेब देहाडराय, गणेश जेजुरकर, मंजूर शेख, बाळू माळी,बापू पवार, कैलास महाजन, समाधान जाधव,शुभम शिंदे, देवदत्त सोनवणे, नसीर पठाण,फैजल शेख, गुलाब महाजन,विलास रासकर, शरीफ शेख, अक्षय जाधव, विजय महाजन,अंबादास सोनवणे, सुनील किरकिरे, सतीश पगारे, नंदू राजोळे, शंकर शिंदे, दत्तात्रय महाजन, पंडित सोमासे,अण्णा जाधव, राहुल पीरनाईक, राजू कायस्थ, संजय पाटील, रिंकू जाधव, माणिक बाविस्कर,दत्तू दैने, पांडुरंग माळी, जिभाऊ माळी,वाळूबा माळी,सुरज पाटील,सागर आहेर, सलमान खान,चंद्रकांत त्रिभुवन, दिलीप सुरसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,
सदर बाबीचा तीव्र निषेध करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.