loader image
[ays_poll id=7]

फीनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स – ६८ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अनुभवला इंग्रजी भाषेत संभाषण

May 31, 2023


फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्सचा समारोप नुकताच पार पडला. या वर्षी देखील इयत्ता ६ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कोर्सला भरघोस प्रतिसाद दिला. मागील ३६ दिवसांपासून दररोज घडयाळी ३ तास व प्रसंगी अतिरिक्त दोन तास क्लास घेण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना इंग्रजी लेखन, वाचन, संभाषण व व्याकरण कौशल्य हे डिजिटल बोर्ड व अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने शिकविले गेले. दर्जेदार शिकविण्याच्या तंत्रामुळे व विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सहभागामुळे विद्यार्थ्यांनी कंटाळा न दाखवता अत्यंत उत्साहाने व आनंदाने कोर्स पूर्ण केला. कोर्सच्या सुरूवातीसच विद्यार्थ्यांना ‘दि इंग्लिश मॅन्युअल’ हे पुस्तक व इतर लेखन साहित्य पुरविण्यात आले. नांवनोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रवेशपरिक्षा घेवून इंग्रजी विषयात त्यांच्या आकलनाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर पुढील प्रत्येक आठवडयात विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यात झालेल्या प्रगतीचे मूल्यमापन विविध चाचण्या घेवून करण्यात आले. तसेच संभाषणकौशल्याचेही नियोजन करून इंग्रजी बोलण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला.

प्रत्येक विद्यार्थ्यांस बोलण्याची योग्य संधी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचे चार गटात विभाजन करण्यात आले. समारोपासाठी पालकांसमोर इंग्रजीत बोलण्याच्या प्रात्यक्षिकासाठी पालक आवर्जून उपस्थित होते. प्रत्येक गटात पालकांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी एक-एक पालकाची निवड केलेली होती. चारही गटाचे सुत्रसंचलन स्पिकींग क्लासमधील देवयानी सुनिल घुले, नंदिनी नवनाथ कुणकुसे, सिध्दी सुनिल काजीकर व कादंबरी सुनिल पाटील या विदयार्थिंनींनी अतिशय सुरेखपणे इंग्रजीमधून केले.

एकूण ६८ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर अतिशय सफाईदारपणे इंग्रजी भाषेत संभाषण करून पालकांना सुखद अनुभव दिला. चारही गटात पालकांचे प्रतिनिधित्व सौ. वनिता नवनाथ कणकुसे, सौ. राणी भास्कर पवार, सौ. आम्रपाली निलेश निकम तसेच डॉ.सुनिल काजीकर, प्रविण मोरे सर, अंदरसुलचे वसंत शिंदे सर यांनी केले. तसेच वरील पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून फिनिक्स क्लासबद्दल व २२ वर्षाच्या उज्वल परंपरेबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच प्रा. मुकेश मिसर यांच्या ‘दि इंग्लिश मॅन्युअल’ या दर्जेदार पुस्तकाबद्दलही आपले लेखी अभिप्राय नोंदविले व विद्यार्थ्यांनी हे पुस्तक दररोज वाचावे, पुस्तकातून शिकण्यासारखे खूप काही आहे.

मनमाड शहरात मागील २२ वर्षापासून फिनिक्स स्पोकन क्लासच्या माध्यमातून ग्रामिण व शहरी भागातील तसेच विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी दैंनदिन जीवनात इंग्रजीचे संभाषण व अभ्यासक्रमातील विविध महत्वाचे मुद्दे लक्षात घेवून व काटेकोर नियोजन करून अत्यंत प्रसन्न वातावरणात व विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून मिसर सरांची शिकवण्याची पध्दत विदयार्थी व पालकांना खुप आवडलेली आहे असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिनिक्स स्पोकन इंग्लिश क्लासचे संस्थापक-संचालक मुकेश मिसर यांनी मांडले. संपूर्ण कोर्स यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कु. अमिता झाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वेळोवेळी कोर्सच्या विविध बाबी पूर्ण करण्यासाठी राजेश सोनवणे, राम महाले, सौ. गौरी जोशी आणि सौ. राजश्री बनकर मॅडम, वैशाली शेजवळ मॅडम व प्रदिप संसारे सर यांचेही सहकार्य लाभले.
आभारप्रदर्शन कु. अमिता झाडे यांनी मांडले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.