loader image
[ays_poll id=7]

बहुजन समाज पार्टी ने बंद पाडले निकृष्ट दर्जाचे काम – सखोल चौकशीची मागणी

Jun 18, 2023

मनमाड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे सुरू असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काम बंद करण्यात आले आहे. संबधित विभागाने सदर बांधकाम तातडीने पाडून प्लॅन इस्टीमेटनुसार सुरू करून बोगस कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण पगारे यांनी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी विशेष प्रयत्न करत मंजुरी आणून, प्रत्येकी पुतळ्याला ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र सदर ठेकेदाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे लक्षात येताच प्रवीण पगारे यांनी प्रत्यक्ष कामावर जात पाहणी करत काम बंद पाडले होते. यावेळी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या बांधकामाचे प्लॅन, इस्टिमेंन्ट, वर्कऑर्डर बघितल्यानंतर पुर्णाकृती पुतळ्याच्या बांधकामात अनेक चुका दिसून आल्या आहे. ठरलेल्या मानकानुसार काम होत नाही. कामाला कुठेही लेव्हल नाही. पुतळ्याचा ओटा हा दोन ते तीन फुटाने कमी बांधण्यात आला आहे. पाठीमागे नियोजित संविधानाची प्रत असलेल्या भिंती ११ इंचाने कमी करण्यात आल्या आहेत. चौथाऱ्यासाठी वापरण्यात येणार असलेली लोखंडी सळई ही १६ एमएमचे ८ रॉड असायला पाहिजे मात्र सहाच रॉड टाकण्यात आले. सर्व बांधकामाला मातीमिश्रित वाळू आणि खंगर आणि अर्धवट विटा वापरल्या जात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नियोजीत पुतळा भविष्यात पुन्हा उभारला जाऊ शकत नाही. मात्र या पुतळ्याच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार होत असून त्याची सखोल चौकशी करावी, संबंधीत ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे, सदर पुतळ्याचे बांधकाम हे नावाजलेल्या स्थानीक बांधकाम व्यावसायिकास द्यावे, शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अभियंता, अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर प्रवीण पगारे, एस. एम. भाले, दीपक गायकवाड, किशोर भाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.