मुंबई – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापनदिन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. शिवसेनेच्या याच वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पक्षाचे “शिवसेना” (shivsenaofc) हे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचा शुभारंभ करण्यात येत आहे. शुभारंभ करण्यात आलेल्या या समाजमाध्यमांच्या अकाउंटवरून यापुढे पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभियान यांची माहिती वेळोवेळी प्रसारित करण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका यावरून प्रसारित करण्यात येणार आहे.
यावरून यापुढे पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभियान यांची माहिती वेळोवेळी प्रसारित करण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका यावरून जाहीर करण्यात येईल. सर्व शिवसैनिकांशी याद्वारे थेट संवाद साधणे सोपे होणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पक्षाच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.
Facebook – https://www.facebook.com/Shivsenaofc
Instagram – https://instagram.com/shivsenaofc
Twitter – https://twitter.com/Shivsenaofc