loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

Jun 22, 2023

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. योगशास्त्राची निर्मिती प्राचीन काळापासून भारतात झाली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि महात्म्य योगातून समजले. योग केल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. तसेच आनंददायी जीवनासाठी नियमित योगासने करणे लाभदायक आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच प्राचार्य प्रा.डॉ अरुण पाटील यांनी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. योगाचे महत्त्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये युनोत विषद केले. त्यानंतर जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी योगाचा स्वीकार केला. दि. २१ जुन २०१५ पासून जागतिक योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला . या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील, उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे, कनिष्ठ विभागा च्या उपप्राचार्या ज्योती पालवे, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य पी.के.बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षण शिबीरास महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल जाधव यांनी योगासनांची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी बी परदेशी प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सुहास वराडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट प्रा. प्रकाश बर्डे, क्रीडा संचालक प्रा. महेंद्र वानखेडे यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका , राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.