loader image
[ays_poll id=7]

लाचखोरीचा कळस – तब्बल ५० लाखाची लाच मागणाऱ्या दिंडोरीच्या उप विभागीय अधिकारी ए सी बी च्या जाळ्यात

Jun 29, 2023


एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई होत असून
आठवड्याला किमान २ ते ३ जण तरी लाच घेताना पकडले जात आहेत. त्यामुळे तक्रारदारांचे प्रमाणही वाढत असून लाचखोर दिवसागणिक समोर येत आहेत. आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी यासारखे बड़े अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. आताही महसूल विभागातील क्लास वन अधिकारी एसीबीच्या गळाला लागला आहे.

दिंडोरीचा उपविभागीय अधिकारी निलेश अपार हा एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी अपार याने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि अपार हा ४० लाखांची लाच मागितली म्हणून गुन्हा असून याप्रकरणी एसीबीच्या पथकाकडून अपार याची चौकशी सुरू असून दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 23 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्याविरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सुमारे 90 गुन्हे दाखल करून तब्बल सुमारे 130 आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.


अजून बातम्या वाचा..

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.