loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात चातुर्मास निमित्त प.पू. महाश्वेतादेवी म. साहब यांचे आगमन

Jun 30, 2023

जैन धर्मीय चातुर्मास निमित्त आज आचार्य सम्राट 1008 आनंद ऋषीजी महाराज यांच्या सुशिष्या परमविदूषी मधुरवक्ता प.पू. महाश्वेताजी म. साहब यांचे आगमन झाले. मोठ्या उत्साहात जैन समाज बांधवांनी स्वागत केले.
साध्विंच्या स्वागत हेतू जालना जिन ते शनिमंदिर, कलंत्री गल्ली ते ओसवाल भवन पर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात आली. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला.
ओसवाल भवन येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांचा जैन समाजातर्फे स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना गुरुमहराजांनी चातुर्मास साठी नांदगाव नगरीत उपस्थित राहणे हे आम्ही आमचे भाग्य असल्याचे सांगितले.
या पुढील पाच महिने संपूर्ण जैन समाज धर्म आराधना करतो, तप, जप, प्रवचनात सहभाग घेत असतो. २४ तास पाणी न पिता जैन धर्मीय तपस्या करतो याला एक उपवास किंवा वास म्हणतात यात कोणी एक कोणी तीन वास तर अगदी ३१ उपवास करून धर्म आराधना केली जाते. जैन समाज बांधव या दिवसात व्यापारा पेक्षा चातुर्मास मधील धर्म आरधनेला जास्त महत्व वे वेळ देत असतो.
या प्रसंगी नांदगाव जैन श्री संघ महिलांनी सारख्या साड्या तर पुरुषांनी शुभ्र वस्त्र धारण केले होते. जैन धर्मीय झेंडा, गळ्यात मफलर परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.
त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की यासारख्या अनेक घोषणा देऊन मिरवणूक संपन्न झाली.
साध्वींच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातून विविध ठिकाणहून त्यांचे श्रावक येथे आले होते.
चातुर्मास नियोजन आनंद नवयुवक मंडळ करत असून या प्रसंगी मोठ्या संख्येने जैन बंधु , भगिनी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.