शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत बारा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले. धुळ्याचे एसपी संजय बारकुंड यांनी सांगितले की, या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर गावात मंगळवारी सकाळी घडली. महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या डंपर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडकून बसस्थानकावर धडकली.

राशी भविष्य : ०६ ऑक्टोबर २०२५ – सोमवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...