loader image

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

Jul 6, 2023


माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांचा हातात भगवा ध्वज देऊन व पुष्पगुच्छ देत शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले तसेच नाना शिंदे,मिलिंद उबाळे माजी नगरसेवक, युवा सेनेचे स्वराज देशमुख यांनीही यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ना. दादाजी भुसे, फरहान दादा खान, सुनील हांडगे, राजाभाऊ भाबड, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, बबलू पाटील, नाना शिंदे, योगेश इमले, आसिफ शेख, मिलिंद उबाळे, महेंद्र शिरसाट, लाला नागरे, दिनेश घुगे,सचिन दरगुडे,पंकज जाधव,उमेश ललवाणी, निलेश ताठे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.