loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

Jul 10, 2023

मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून तर
जय भवानी व्यायाम शाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात निवड
उत्तर प्रदेश नोएडा येथे दिनांक 12 जुलै ते 16 जुलै 2023 दरम्यान होणाऱ्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी वरिष्ठ गटात मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात 55 किलो वजनी गटात निवड करण्यात आली आहे नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनिअर व सीनियर गटात राष्ट्रीय विक्रम स्थापित करणारा मुकुंद आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाला असून नोएडा येथे होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद भारतासाठी पदक प्राप्त करण्याची शक्यता आहे
तसेच आपल्या सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून निवड झालेली तृप्ती शेखर पाराशर ही महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षक असून स्पर्धेत खेळाडूंकडून उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे
मुकुंद आहेर यास छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुखपदी सतीश परदेशी यांची  निवड

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुखपदी सतीश परदेशी यांची निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या प्रति असलेली निष्ठा सामाजिक कार्याची बांधिलकी व उत्तम...

read more
बघा व्हिडिओ – प्रभु श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड याच्या पुतळ्याचे मनमाड शिवसेनेतर्फे दहन

बघा व्हिडिओ – प्रभु श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड याच्या पुतळ्याचे मनमाड शिवसेनेतर्फे दहन

सकल हिंदु समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या राजकीय...

read more
नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक - राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची...

read more
शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आमदार सुहास आण्णा कांदे, सौ.अंजूमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री...

read more
क्रांतिज्योती फुलेंची प्रतिकृती फुलांवर!कल्पना अन् कलेचा सुंदर आविष्कार देव हिरेंकडून सादर.

क्रांतिज्योती फुलेंची प्रतिकृती फुलांवर!कल्पना अन् कलेचा सुंदर आविष्कार देव हिरेंकडून सादर.

काट्यांमधून मार्ग काढत गुलाबाचा सुगंध जसा परिसर दरवळून टाकतो अगदी तसाच काट्यांचा संघर्ष करत फुले...

read more
.