loader image

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Jul 10, 2023


नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून आज सिन्नर येथील भूमीअभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) सापळा यशस्वी ठरला आहे. या कार्यालयातील परीरक्षण भूमापक प्रतिभा दत्तात्रय करंजे ही लाचखोर पाच हजार रुपयांची लाच घेतांना जाळ्यात अडकली आहे. ५ हजार रुपयांची लाच घेताना ती रंगेहात सापडली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अधिक माहितीनुसार, एका व्यक्तीचा मनेगाव येथे प्लॉट आहे. या प्लॉटवरील जुन्या मालकाचे नाव कमी करुन नव्या मालकाच्या नावे नोंद करायचे होते. त्यासाठी ती व्यक्ती भूमीअभिलेख कार्यालयात आली. तर, लाचखोर करंजे हिने त्याच्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि हा सापळा यशस्वी ठरला. आता या प्रकरणी करंजे हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान सापळा यशस्वितेसाठी

आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा. उप संचालक भूमि अभिलेख नाशिक प्रदेश ,नाशिक
विश्वजीत जाधव पोलीस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सहायक सापळा अधिकारी :-
श्री परशुराम कांबळे , पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक पो. हवा .श्री प्रकाश डोंगरे
पो हवा .श्री संतोष गांगुर्डे
पो. हवा .श्री प्रणय इंगळे
म पो. कॉन्स्टेबल श्रीमती शितल सूर्यवंशी

मार्गदर्शक
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक

श्री माधव रेड्डी
अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक.

श्री. नरेंद्र पवार
वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.