loader image
[ays_poll id=7]

हिसवळ खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ.विजय कदम यांची निवड

Jul 15, 2023


हिसवळ खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ. विजय विश्वनाथ कदम तर व्हा. चेअरमन पदी सोजेराव शंकर बिन्नर यांची आज बिनविरोध निवड झाली. नांदगाव येथील सहाय्यक निबंध कार्यालयात यासाठी एक विशेष सभा बोलविण्यात आली होती त्या ठिकाणी कार्यालयाचे अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव सखाहरी कदम यांनी सभेला सुरुवात केली. त्यावेळी सर्वच्या सर्व तेरा संचालक उपस्थित होते डॉ. विजय विश्वनाथ कदम यांचे अर्जावर सूचक म्हणून विश्वास रंगनाथ आहेर तर अनुमोदक म्हणून संतोष बाबुराव आहेर यांनी स्वाक्षरी केली तर व्हा. चेअरमन पदासाठी सोजेराव शंकर बिन्नर यांचे अर्जावर मोहन एकनाथ आहेर यांनी सूचक म्हणून सही केली तर अनुमोदक म्हणून विजय पंढरीनाथ आहेर यांनी स्वाक्षरी केली दोन्ही पदांसाठी एक, एकच अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी सर्वानुमते त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री पाटील साहेब यांनी जाहीर केले यावेळी संचालक विश्वास रंगनाथ आहेर, मोहन आहेर, विजय पंढरीनाथ आहेर, संतोष बाबुराव आहेर, प्रशांत बाळासाहेब आहेर, तुळशीराम सदगीर, पांडुरंग दैनै, रमेश अहिरे, नारायण आहेर, वर्षा संजय आहेर, शिलाबाई मनसुख आहेर आदि संचालक उपस्थित होते यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे हस्ते नवनिर्वाचित चेअरमन,व्हा. चेअरमन यांचा शाल श्रीफळ व छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.उपसरपंच संजय आहेर यांनी मनोगत व्यक्त करताना.बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी हिसवळ व शास्त्रीनगर चे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.