भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक :आरक्षण सोडतीने उडविली मातब्बरांची झोप
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट अनुसुचित जाती स्त्री या प्रवर्गा...










