भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
आरोग्य विभाग भरतीचा घोळ : टोपे साहेब उत्तर द्या – विद्यार्थ्यांचा ट्विटरवर एल्गार !
मागील महिन्यात आयोजित आरोग्य सेवेतील पदभरतीत उडालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप सरता...


