Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

Jul 22, 2023

मनमाड – येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी अजय जैन याच्यासह अक्षय छाजेड या दोहोंना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून मनमाड शहरातून ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

येवला शहरात असलेल्या (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे कर्मचारी अशांनी संगनमत करून खातेदार व ठेवीदारांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा

घडल्यापासून फरारी होता. त्याला अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नेमणूक केली होती. अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लपत होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजय जैन हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे समजले असता तातडीने पथक रवाना करण्यात आले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी भागात त्याचा शोध घेतला असता तो मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून मनमाड शहरातील माधवनगर भागातून अजय जैन (छाजेड), अक्षय रवींद्र छाजेड (दोघेही रा. येवला) यांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनमाड शहर डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा शिबिराचे आयोजन

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनमाड शहर डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा शिबिराचे आयोजन

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनमाड शहर डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा...

read more
मोहरम सण : मनमाड मधील दाऊदी बोहरा समाजाच्या बांधवांची दुकाने ३० जुलै ७ ऑगस्ट पर्यंत राहणार बंद

मोहरम सण : मनमाड मधील दाऊदी बोहरा समाजाच्या बांधवांची दुकाने ३० जुलै ७ ऑगस्ट पर्यंत राहणार बंद

दाऊदी बोहरा समाजाच्या पवित्र अशा मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील बोहरी बांधवांची सर्व...

read more
आता नाशिक मधील रस्ते-परिसर दिसणार ३६०° अंशात ; गुगल स्ट्रीट व्हीव नवीन फिचरने वाढणार रंगत

आता नाशिक मधील रस्ते-परिसर दिसणार ३६०° अंशात ; गुगल स्ट्रीट व्हीव नवीन फिचरने वाढणार रंगत

गूगल (Google) नवी फीचर आणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. गूगल मॅप्सने...

read more
प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमात सहभागी व्हावे : विकास काकडे

प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमात सहभागी व्हावे : विकास काकडे

प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमांतर्गत केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मनमाड मधील...

read more
एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]