Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

Jul 22, 2023

मनमाड – येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी अजय जैन याच्यासह अक्षय छाजेड या दोहोंना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून मनमाड शहरातून ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

येवला शहरात असलेल्या (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे कर्मचारी अशांनी संगनमत करून खातेदार व ठेवीदारांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा

घडल्यापासून फरारी होता. त्याला अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नेमणूक केली होती. अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लपत होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजय जैन हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे समजले असता तातडीने पथक रवाना करण्यात आले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी भागात त्याचा शोध घेतला असता तो मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून मनमाड शहरातील माधवनगर भागातून अजय जैन (छाजेड), अक्षय रवींद्र छाजेड (दोघेही रा. येवला) यांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

कृषीमंत्री दादा भुसे यांचे खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे...

read more

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त,३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार...

read more

आंतरराष्ट्रीय अबॅकस व वेदिक मॅथ चॅम्पियनशिप स्पर्धेत मनमाड च्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर मनमाड येथील गुडविल अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी...

read more

एम जी व्ही मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (फुटबॉल) स्तरावर झेप

महात्मा गांधी विद्यामंदीर संचलितकला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड,शैक्षणिक वर्ष २०२१-२२...

read more

मनमाड महाविद्यालयात लोकमाता महिलारत्न पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन “काव्यपुष्प” वाचन स्पर्धा कार्यक्रम संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. ए....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]