loader image
[ays_poll id=7]

देशातील सर्व सहकारी संस्थांना माहितीचा अधिकार कायदा लागू

Jul 31, 2023

महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली होती या सहकार चळवळीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला होता राज्याच्या प्रगतीमध्ये सुद्धा या सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे परंतु या सहकार क्षेत्रात अनिष्ट प्रवृत्तींनी शिरकाव केल्यामुळे सहकार कायद्यातील प्रचलीत कमजोर कायद्यान मुळे आणि सहकारी संस्थांना माहितीचा अधिकार कायदा लागू नसल्यामुळे या क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळाला होता यामुळे सहकारी संस्थांवरील जनसामान्यांचा विश्वास डळमळीत होत असताना देशाचे केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शहा यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीसह ते अधिक पारदर्शक करून त्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बहुराज्य सहकार संस्था विधेयक 2022 लोकसभेत मंजूर करून घेतले येत्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर या नवीन सहकार संस्था विषयी कायद्याचे धोरणाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे ज्येष्ठ समाजसेवक माननीय डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या अथक परिश्रमातून जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कायदा संपूर्ण देशात लागू झाला होता तो माहितीचा अधिकार कायदा आता देशातील सर्व सहकारी संस्थांना लागू होणार आहे हे या नवीन सहकारी कायद्याचे विशेष आहे या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना या माहितीचा अधिकाराचा समावेश असलेल्या नवीन सहकार कायद्याचे आकलन होण्यासाठी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि या नवीन कायद्यामुळे सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व सहकारी संस्थांना व त्यातील पदाधिकारी व सभासदांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येऊन या कायद्याचा प्रचार आणि प्रसार होणे कामी नांदगाव तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने माहितीचा अधिकार कायदा 2005 या पुस्तकाची एक प्रत नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक श्रीमती मनीषा खैरनार यांना सप्रेम भेट देण्यात आली या प्रसंगी तालुका अध्यक्ष भिमराज लोखंडे तालुका सचिव भास्कर झाल्टे,कार्याध्यक्ष कदिर शेख आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे मनमाड शहराध्यक्ष विष्णू चव्हाण उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.