loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठा

Aug 1, 2023

नांदगाव

शहरातील आनंदनगर भागात आज गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी  नांदगाव- संभाजीनगर रोडवर रास्ता रोको केला होता.. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येने  नांदगाव नगरपरिषद कार्यालयावर  मोर्चा काढला .

सोमवारी सकाळी आनंदनगर भागात गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी  नांदगाव- संभाजीनगर रोडवर सकाळी ८ / ३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आनंदनगर येथून मोर्चाला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गाने  संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन शेकडोच्या संख्येने नांदगाव नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी
मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते.त्यामुळे गढूळ पाणी आले आहे. आपल्याला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल. लवकरच नांदगाव शहरासाठी जलशुद्धीकरण केद्र उभारण्यात येणार आहे. तसेच शहरासाठी  पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या मोर्चात माजी नगरसेवक अरुण साळवे, अनिल जाधव,विश्वास अहिरे, नितीन जाधव, अँड सचिन साळवे, मनोज चोपडे, अविनाश केदारे, सचिन पगारे, डी. एन.कटारे, दिपक अंभोरे, विश्वास आहिरे, मनोज चोपडे, ॲड.विद्या कसबे, आक्काबाई सोनवणे,शोभा देवकाते,कमल आहिरे आदींसह शेकडो महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.