loader image
[ays_poll id=7]

पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला जीवदान

Aug 4, 2023

दरेगाव – माणूस आणि कुत्रा यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खुप जवळचे राहिलेले आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जवळ जर कोणता प्राणी माणसाच्या जवळ असेल तर तो म्हणजे कुत्रा. वफादारी निभावण्यात देखील श्वान कित्येकदा मालकांसाठी जिवाची बाजी लावतात मात्र माणूस देखील अनेकदा आपल्या मित्रासाठी असा प्रयत्न करतो. अशीच एक घटना समोर आली असून चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे कातरणी वडगाव रस्ता पाण्याच्या टाकी हनुमान मंदिराजवळ दत्तू बाळू गोजरे यांच्या शेतालगत असणाऱ्या 42 फुट विहीरीत पाच दिवसापासून (दि. 30) रोजी रात्रीच्या सुमारास कोरड्या विहिरीत पडला.कुत्र्याचा आवाज बाहेर येऊ लागला त्यावेळेस बाळू पुंजा गोजरे हे विहिरीत डोकावून पाहिले. त्याला स्थानिकांनी काढण्यासाठी बरेच प्रयत्न करून बघितले पण अपयश ठरले.समाजसेवेत कायम धावून जाणारे भागवत झाल्टे यांना बाळू गोजरे यांनी सर्व हकीगत सांगितली. झाल्टे यांनीं उशीर न करता तात्काळ भेट दिली व कुत्र्याला बिस्किट व भाकरी टाकल्या व विहीर जुनाट व अवघड असल्यामुळे काढण्यासाठी मुश्किल होते.झाल्टे यांनी वन वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे येवला यांच्याशीं संपर्क साधला व तात्काळ वन विभागाच्या कर्मचारी वनरक्षक सोनाली वाघ, वनरक्षक मॅडम वंदना खरात वन कर्मचारी अंकुश,गुंजाळ संजय गुंजाळ हजर झाले. कुत्रा काढण्यासाठी रेस्क्यू काम चालू झाले बऱ्याच प्रयत्नानंतर कुत्रा काढण्यासाठी पावणे दोन तासाचा कालावधी लागला वन कर्मचारी वडगांव ग्रामस्थ, समाजसेवक भागवत झाल्टे वनविभाग कर्मचारी यांच्या प्रयत्नाने कुत्रा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याने कुत्र्यास जीवदान मिळाले.यावेळी वडगांव पंगु चे पोलीस पाटील सागर पवार,वाल्मीक गोजरे, बाळू गोजरे,शंकर झाल्टे व स्थानिक शेतकरी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भारतीय रेल्वे 554 स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजने मध्ये मध्य रेल्वे भुसावळ मंडलातील रापली अंडरपास निर्माण विकास कामाचे  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने द्वारे शुभारंभ व लोकार्पण  कार्यक्रम संपन्न

अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय रेल्वे द्वारे 554 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास...

read more
.