loader image

मनमाड शहरात अंगणवाडी सेविकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Aug 10, 2023


मनमाड विभाग येथे डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
आजादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीर सेविकाताई याच्यांसाठी मनमाड येथे आयोजन करण्यात आले
बाल विकास प्रकल्प (नागरी) जि.नाशिक.आ.श्री.चंद्रशेखर पगारे -प्रकल्प अधिकारी तसेच श्रीमती शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी केंद्र मनमाड,नादंगाव,येवला या विभागातील सेविका ताई यांची आरोग्य तपासणी आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय मनमाड येथे करण्यात आली..
.या शिबीरा मार्फत खालील प्रमाणे मोफत तपासणी करणे विषयी शासन निर्देश देण्यात आले आहे १) complete blood count.२) VIA/pap smear.३) Mammogram.४)Clinical Breast exam.५). Blood – Pressure Determination.६). Lipid Profile.७).Urine Analysis.८). Dental Examination Oral Cancer Screening.९) Blood Sugar level.१०).ECG.इ.तपासणी या व्यतीरिक्त इतर उपलब्ध मोफत तपासणी सेविका ताई,मदतनिस ताई यांची आरोग्य तपासणी करणे बाबत..वरील शासन निर्देशानुसार मनमाड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे आज रोजी ४२ अंगणवाडी सेविका ताई याच्यांसाठी डाँ.आनंदीबाई जोशी या शिबीराचे आज आयोजन करण्यात आले.
या शिबीरात वैद्यकीय अधिकारी गोरे सर,सिस्टर लाड, तपासे मॅडम लॅब टेक्निशियन सोनवणे व आरोग्य विभागाचें सर्व कर्मचारी वर्ग यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले. अतिशय छान पध्दतीने या सर्व तपासण्या सेविका ताई च्या करण्यात आल्या..मुख्यसेविका शितल गायकवाड यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले..प्रकल्पाच्या वतीने रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग यांना पुष्प गुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले.तसेच अडसुळे ताईनीं प्रकल्पच्या वतीने आभार मानले.. सर्व सेविका ताईच्यां सहकार्याने हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.