loader image

दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

Aug 11, 2023


दीड वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत शांत झोपला असताना रात्रीच्या अंधारात सळसळणारा मण्यार जातीचा साप घरात येऊन बाळाच्या अंगठ्याला चावा घेतल्याने तब्बल तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या कान्हाने डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे मृत्यूशी दोन हात करत ७२ तासांनी डोळे उघडुन आपल्या आई वडिलांना बघितले. आपलं बाळ मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे पाहून आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.

साप दिसताच अनेकांना घाम फुटतो. अनेकांच्या अंगावर काटा येतो. काहींना केवळ सापाचं नाव ऐकलं तरी भीती वाटते. कारण सापाच्या एका चाव्याने माणसाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे सापाबाबत लोकांच्या मनात प्रचंड भीती असते. असाच मन पिळून टाकणारा प्रकार घडला. योगेश पवार हे आपल्या कुटुंबासमवेत वंजारवाडी गावाजवळ असलेल्या जाधव वस्तीवर रहातात. त्यांना एक दिड वर्षाचा बालक असून त्याचे नाव कान्हा आहे. दिसायला गोंडस आणि गोरागोमटा असलेला कान्हा सर्वांचा आवडता आहे. भूक लागली म्हणून आपल्या आईकडे जाऊन त्याने खायला मागितले. आईने त्याला खाऊ पिऊ घातले. पोट भरल्यामुळे कान्हा बाहेर खेळायला गेला. खेळून दमलेला कान्हा पुन्हा आईच्या कुशीत येऊन झोपी गेला. मात्र झोपेत असतांनाच रात्री तो जोरात ओरडुन उठून रडू लागल्याने काय झाले म्हणून त्याला पाहत असतांनाच सापाने बाळाचा उजवा अंगठा तोंडात धरलेला पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्याची आई पूजा ही घाबरली. तिचे अंग थरथर कापू लागले. तिने सर्वांना जोरात ओरडुन आवाज दिला. पूजाच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले. तिने ओरडुन साप साप म्हणत असताना सर्वांनी रडणाऱ्या मुलाकडे पाहिले तर त्यांनी धक्का बसला. तात्काळ सापाला ओढून सापाच्या तावडीतून बाळाची सुटका करण्यात आली. बाळाचा अंगठा रक्तबंबाळ झाला होता. साप चावल्याने सर्वांच्या मनात भीतीने काहूर केले होते. वेळ न घालवता तातडीने बाळाला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले परंतु चावलेला साप हा मण्यार जातीचा असल्याने तो विषारी होता. त्यामुळे परस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी मुलाला मालेगाव येथील रुग्णालयात पाठवले परंतु बाळाची तब्बेत बिघडत चालली असल्याने त्यास तातडीने नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. तब्बल तीन दिवसांनी बाळाने डोळे घेऊन आपल्या आई वडिलांकडे बघितले. सुमारे ७२ तास दीड वर्षाचा कान्हा मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याने मृत्यूशी दोन हात करत त्याला हरविले होते. आपला मुलगा मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे पाहून आई वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले होते. तसेच तीन दिवसांपासून वंजारवाडी गावातील ग्रामस्थ बाळाला साप चावल्याने हळहळत होते. तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रत्येकांनी मनोकामना केली होती. बाळ सुखरूप असल्याचे कळताच ग्रामस्थांना आनंद झाला.

 


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.