पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम
मारहाण करण्यात आली आहे. हा सरळसरळ लोकशाही स्वातंत्र्यावर घाला असून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी
करण्याचा प्रकार आहे. आज राज्य आणि देशभरात वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सुरू असून पत्रकारांवर हल्ले वाढलेले आहेत. पत्रकार अतिशय असुरक्षित वातावरणामध्ये काम करत असून अनेकांना दबावाखाली काम करावे लागते आहे. ही परिस्थिती वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आणि निकोप लोकशाहीसाठी घातक असून आम्ही सारे मनमाड मराठी पत्रकार संघाचे सदस्य ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत.
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण मिळावे, पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनमाड शहर पोलिस निरीक्षक थोरात यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनावर
अमोल खरे (तालुकाध्यक्ष),
अशोक परदेशी,
नरेश गुजराथी,
सतीश शेकदार,
निलेश वाघ,
संदीप जेजुरकर,
नरहरी उंबरे,
संदीप देशपांडे,
अशोक बिदरी,
तुषार गोयल,
उपाली परदेशी,
गणेश केदारे,
अफरोज अत्तार,
नाना आहिरे,
योगेश म्हस्के,
आनंद बोथरा,अनिस शेख,
सॅमसन आव्हाड आदी उपस्थित होते.