मनमाड शहरातील नामवंत अशा सिद्धी क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव 2023 सोहळा १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुहास अण्णा कांदे हे उपस्थित राहणार आहे.
शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता हिरा लॉन्स येथे क्लासेसच्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्लास तर्फे करण्यात येणार आहे याप्रसंगी
श्री प्रकाश भागाजी घुगे( मा. सभापती कृ. उ. बा. समिती मनमाड)
श्री योगेश (बबलू) पाटील( मा. नगराध्यक्ष मनमाड )
तसेच वैद्यकीय क्षेत्रातील देवकी हॉस्पिटलच्या संचालिका
डॉ. पूनम रवींद्र राजपूत, मनमाडच्या विद्यमान नगरसेविका माननीय सौ.सविताताई साईनाथ गिडगे,
मा. नगरसेवक बंडू नाना सांगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
छत्रे न्यू इंग्लिश स्कूल चा दहावीचा निकाल 98.85%
मनमाड येथील छत्रे न्यु इंग्लिश स्कुल चा इयत्ता दहावीचा निकाल 98.85 टक्के लागला असून सर्वात जास्त...












