मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात.
सिंह : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तूळ : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शत्रुपीडा नाही. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनू : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर : आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.
मीन : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.