loader image

मनमाड महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Aug 15, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. एन.सी.सी लेफ्टनंट बर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ध्वजारोहण व राष्ट्रगीता नंतर आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आज भारत हा जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे भारतात सर्वात जास्त तरुण आहेत या तरुणाईच्या बळावर भारत लवकरच एक महाशक्ती बनेल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य सौ ज्योती पालवे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पी. के बच्छाव, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, वरिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक सुहास वराडे, कनिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक महेंद्र वानखेडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रंगरंगोटी,सजावट,साफसफाई साठी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. त्यासाठी एनसीसी लेफ्टनंट बर्डे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ परदेशी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
.