loader image

कासलीवाल विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Aug 15, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल व सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी नगराध्यक्षा शकुंतलाताई कवडे,
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या व देवाज हेल्थ अँड फाउंडेशनच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी अंजुमताई कांदे व शकुंतलाताई कवडे यांचा संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल व सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल सेक्रेटरी विजयकुमारजी चोपडा यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह ,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सन्मानपत्र वाचन सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार व अतिथींचा परिचय सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल सावंत यांनी करून दिला.
याप्रसंगी अंजुमताई कांदे यांनी संस्थेचे कौतुक करताना 1999 पासून श्री.माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट च्या सर्व शाळा या हजारो विद्यार्थ्यांना घडवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवीत आहे. यात संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल व सर्व विश्वस्त शिक्षक यांची मेहनत आहे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी शालेय क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन व अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळ, हाऊस कॅप्टन व टीमने संचलन केले.
यानंतर कार्तिकी पाटील ,यश निकम आकाश साळवे, भावना गुढेकर या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यात देशभक्तीपर गीत ,नृत्य,सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल चे शिक्षक विनोद अहिरे सरांनी देखील देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .
या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील
1)चंचल राजेश सानप
2)वैभवी रवींद्र वाघ
3)हर्षवर्धन बाबासाहेब साठे
या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय
तर जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलच्या
1)पूनम नीलेश सुराणा
2)संस्कृती किरण डोंगरे
3)सार्थक विजय देशमुख
या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
तसेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी
1)अद्विक विशाल सावंत
2)रूद्र नंदू जाधव
3)समीक्षा गणेश निकम
तसेच मागील वर्षातील इयत्ता नववीच्या वर्गात प्रथम आलेल्या सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील विधी मनोज साळुंखे
व जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलचे विद्यार्थी 1). रोनक विजय गंगवाल
2)अनुष्का राजेंद्र पगार
3) यश प्रवीण निकम
तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणारा दर्शन चेतन आबड या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल डायरी अल्मॅनिकचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रिन्सिपल मनी चावला यांनी या डायरीचे महत्व व उपयोग सांगितले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या व देवाज हेल्थ अँड फाउंडेशनच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे ,माजी नगराध्यक्षा शकुंतलाताई कवडे,
संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,
विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,
श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल,
सुशीलकुमार कासलीवाल ,आनंदभाऊ कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल,
महेंद्र चांदीवाल, प्रशासन अधिकारी पी.पी गुप्ता ,
प्रमिलाताई कासलीवाल, निर्मलाताई कासलीवाल,प्रितीताई कासलीवाल ,पुषाताई चांदीवाल ,प्रतिक कासलीवाल, अभिजित कासलीवाल,समीर कासलीवाल, अंकित कासलीवाल
मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार , विशाल सावंत, प्रिन्सिपल मनी चावला, गोरख डफाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका राजपूत व
तन्मय दगडे तर सिद्धार्थ जगताप यांनी आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.