loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा.

Aug 16, 2023


 

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालिका आयशा सलीम गाजीयानी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनमाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी, सेक्रेटरी हज्जन सायरा बानो सलीम अहमद, सदस्य श्री. अब्दुल करीम गाजीयानी,श्री. अफजलभाई गाजीयानी,आदिलभाई गाजीयानी, सादिकभाई पठाण व तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.शाळेच्या प्रांगणात शाळेतील शिक्षिकांनी रांगोळीची लक्षवेधी सजावट केली होती.
ध्वजारोहणा नंतर स्वातंत्र्य दिनावर सांस्कृतीक कार्यक्रमात लेझीम पथकाने देशभक्ती गीतावर नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच उर्दु व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी पिरॅमिड (मनोरा), रिंग झेडी, डंबेल्स व स्काऊट गाईड, MCC च्या विद्यार्थ्यांचे परेड संचालन घेण्यात आले तसेच शाळेतील विदयार्थीनींनी देशभक्तीवर भाषणे व समुहगीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद गाजीयानी होते. शाळेचे उपशिक्षक अनिस खान सर यांनी अध्यक्षांचा व उपस्थित मान्यवरांचा परिचय करुन दिला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर व शेख आरीफ कासम यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन फेब्रुवारी/मार्च २०२३ परीक्षेत इ.१० वी उर्दु व मराठी माध्यम इ.१२ वी कला व विज्ञान शाखेतून या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातुन प्रथम आलेले तीन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना संस्थेतर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.
संस्थेच्या सचिव हज्जन सायराबानो सलीम गाजीयानी यांनी सर्व कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी, विद्यार्थीनी शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची प्रशंसा केली व उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर मनमाड एज्युकेशन सोसायटी तर्फे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटांचे पाकीटे देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक शेख रब्बानी सर, श्री.जगताप शानुल सर, कराड सविता मॅडम, अनिस खान सर यांनी केले. तसेच आलेल्या पाहुण्यांचा आभार व्यक्त करण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालिका आयशा गाजीयानी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.