Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कर्मवीरांमुळे आज मविप्र शिखरस्थानी -प्राचार्य डॉ. किशोर पवार यांचे प्रतिपादन

Aug 19, 2023

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मनमाड या तिन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमाने समाज दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्राचार्य डॉ. किशोर पवार सर यांच्या हस्ते ध्वजपुजन करून ध्वजारोहण करण्यात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेज स्थानिक व्यवस्थापन कमिटी चे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी भूषविले.

ध्वजारोहण नंतर राष्ट्गीत व समाज गीत गायन केले. त्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज चे प्राचार्य डॉ डी.डी . गव्हाणे सर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी कर्मवीर वर भाषणे केली. त्यानंतर समाज दिना निमित्ताने विविध स्पर्धा चे आयोजन शाळेत करण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच सिनिअर व ज्युनिअर कॉलेज चे प्रथम व द्वितीय आलेले विद्यार्थ्यांना देखील बक्षीस वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. पवार यांनी त्यांच्या व्याख्यान मध्ये विद्यार्थ्यांना कर्मवीरांची जीवन कार्याबद्दल माहिती सांगितलं. तसेच श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको हे देखील खूप छान पध्दतीने विद्यार्थ्यांना संगितले. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थी हीच शिक्षकाची ओळख आहे दैवत आहे. तसेच अपयशाने खचून जाऊ नका अधिक जिद्दं ने स्वप्न पूर्ण करा.

कार्यक्रमाचे अध्यक्ष साळुंके साहेब यांनी देखील अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिका मोठे व्हा. असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समिती चे सदस्य शंकरराव बोडके, सिद्धर्थ संसारे, हिरामण कुसमाडे, विजय दरगुडे, सुनील गावंदे, फकिरशेठ शिवदे, चंद्रकांत मेंगाने, योगेश कदम, घुगे , प्रकाश काळे, मोहन अण्णा आहेर, आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. हारदे मॅडम व श्रीम. कवडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम. धात्रक मॅडम यांनी केले.

तसेच कॉलेज चे प्राचार्य श्री गव्हाणे सर, अभिनव चे मुख्याध्यापक वाघ सर, आदर्श च्या मुख्याध्यापिका श्रीम. मढे मॅडम. व तिन्ही शाखेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]