loader image

कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी

Aug 22, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी केली जाते . येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज रावसाहेब थोरात यांची जयंती साजरी करण्यात आली . याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी प्रा. अशोक सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म वि प्र संचालक अमित बोरसे पाटील होते. मविप्रचे आद्य संस्थापक बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या जीवाचे रान करून समाजात शिक्षणाचा प्रसार करत होते. सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव कर्मवीरांवर होता. सयाजीराव गायकवाड, धारचे राजे श्रीमंत पवार, वाघ गुरुजी इत्यादी त्यागमूर्तींच्या सहकार्याने मविप्रची वाटचाल सुरू झाली. सर्व कर्मवीरांनी मविप्रच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. या वाटचालीत नांदगाव तालुक्याचे कै. वामन आप्पा पाटील, कै. भास्कर पाटील, कै. लीलाताई पाटील माजी खासदार कै. आण्णासाहेब कवडे यांचेही योगदान असल्याचा उल्लेख प्रा. सोनवणे यांनी केला बदलत्या काळाप्रमाणे नवीन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असा आवर्जून उलेख केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते व मविप्रचे माजी संचालक कै. साहेबराव (आण्णा) आनंदा पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या हस्ते मविप्र ध्वजारोहण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव च्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व समाजगीत सादर केले. उपस्थित सभासदांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सरस्वती पूजन व सर्व कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले नाशिक येथील उद्योगपती डी. एस. रिंढे यांच्या आर्थिक मदतीने महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी केले याप्रसंगी गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार जगन्नाथ धात्रक विलास आहेर ,डी एस रिंढे, सतीश पावशे व मविप्र सभासद बांधव व्यासपीठावर उपस्थित होते. विजय काकळीज ,अशोक जाधव यांनी मविप्र सभासदांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मविप्र सभासदांचा सत्कार डी. व्ही. गोटे, बी. बी. आथरे, के. के. तांदळे यांच्या हस्ते करण्यात आला. मविप्र संचालक श्री अमित बोरसे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मविप्र समाज कार्यकारिणीने नांदगाव तालुक्यातील सभासद, सर्व शाखा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले त्याची माहिती उपस्थितांना दिली. नांदगाव तालुक्याला शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आणण्याचा मानस अमित बोरसे पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती पवार व डी.एम .भिलोरे यांनी केले तरआभार प्रदर्शन उप प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.