▪मनमाड (प्रतिनिधी)- मनमाडसारख्या दूर्लक्षित शहरातून महात्मा फुले अभ्यासिका व वाचनालयासारखे काम उभे राहिले व यशाचा अनुभव मला आणि माझ्या आईवडिलांना अनुभवता आला.असे मत पोलिस निरीक्षक (सी.आर.पी.एफ.) पदी निवड झालेल्या रोशन अहिरे यांनी व्यक्त केले.अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात तो बोलत होता.या गुणगौरव सोहळ्यास माजी आमदार जगन्नाथराव धात्रक ,संस्थेचे सचिव संतोष बळीद व वाचनालयीन चळवळीतील खंदे कार्यकर्ते एस.एम.भाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनहित विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकआप्पा परदेशी होते.
महात्मा फुले अभ्यासिकेचा लाभ घेत 44 विद्यार्थी विविध अधिकारी वा पोलिस ,रेल्वे इ.स्पर्धा परीक्षेत चमकले असून त्यांचा गौरव अभ्यासिकेत करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अभ्यासिकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
माजी आमदार जगन्नाथराव धात्रक यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,”ज्ञान हे केवळ माणसाच्या जगण्याचे साधन नसून ते समाजविकासासाठीचे शस्त्र आहे.मनमाड जनहित संस्थेने ही अभ्यासिका एका व्रतस्थपणे चालविली असून अठरापगड जाती धर्माचे विद्यार्थी यश मिळवतांना पाहून एक संतुष्टता आम्ही अनुभवत आहोत.
संस्थेचे सचिव संतोष बळीद यांनी हि अभ्यासिका मनमाडमधील नवयुवकांसाठी दिशादर्शक ठरली आहे असे आपल्या मनोगतातून मांडले व महात्मा फुले अभ्यासिका आणि जनहित विकास संस्था या मनमाडच्या आस्थेच्या आणि अस्मितेच्या बाबी झाल्या आहेत असे सांगितले.
बहुजन समाज प्रबोधन समितीचे अध्यक्ष व पंचशील वाचनालयाचे एस.एम.भाले यांनी मतदार जागा असेल,ज्ञानी असेल तरच लोकशाहीला बळ मिळेल असे सांगत वाचनालये,अभ्यासिका यातून जागरुक अधिकाऱ्यांबरोबरच सुजाण राजकारणीही घडावेत असे मत मांडले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी संस्थेच्या यशाचे श्रेय गुणवंत विद्यार्थ्यांनाच जाते असे म्हणून मनमाडच्या पंखांना बळ देण्याचे काम युवकांनी आपली कर्तबगारी दाखवित करावे असे मत मांडले.
सी.ए.परीक्षेत उच्चश्रेणीसह उत्तीर्ण झालेली कु.प्रेक्ष्या ललवाणी हिनेही यावेळी मनोगतातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असल्याने अभ्यासिका ,वाचनालये यांची संख्या वाढायली हवी असे मत मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन अभ्यासिका समितीचे अध्यक्ष जनार्दन देवरे यांनी केले तर कोषध्यक्ष मनोज गांगुर्डे यांनी आभार मानले.यावेळी सुशांत केदारे, रतन निकम, m b ढेंगळे, रश्मी मोरे, सुवर्णा निकम,लीला राऊत,सूर्यकांत राजगिरे,कविता मोरे, भाग्यश्री देशपांडे आदी उपस्थित होते.
राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....








