नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खु. ग्रामपंचायत हद्दीत व मांडवड शिवारात सुरू असलेले एस.ए.यादव कन्स्ट्रक्शन यांचे खडीक्रेशर हे दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असल्या कारणाने त्वरीत बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत हिसवळ यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मांडवड ता. नांदगाव येथील गट ६५.२ मध्ये एस.ए.यादव कनस्ट्रक्शन मार्फत डोंगर फोडुन खडी क्रेशरच्या माध्यामातून मोठे काम चालू असून विविध वाहनांमार्फत खडीची वाहतुक केली जाते. वरील खडीक्रेशर हे मांडवड महसुल हद्दीत असले तरी संबंधित खड़ी क्षेत्र हे हिसवळ गावचे रहिवाशी हदीत आहे. सदर खडी क्रेशर हे हिसवळ खुर्द गावापासून नऊशे मिटर अंतरावर असून २४ तास खडीक्रेशर सुरु असते त्यातुन निघना-या धुळीच्या कामामुळे गाव परीसरातील रहिवाशाच्या आरोग्यावर गंभीर परीणाम होत आहे . सध्या सुरु असलेल्या दुष्काळी परीस्थीतीत विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण सुरु आहे. उत्खनन करण्यासाठी मोठ्याप्रमाणात स्फोटके, ब्लास्टींग केली जाते त्या हादऱ्यामुळे परीसरातील विहीरीच्या पाणीपातळीवर गंभीर परीणाम होत आहे. पाण्याची पातळी संपुष्टात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे खुप मोठे नुकसान होत आहे, यापूर्वी सदर खडी क्रेशरमुळेचे परीसराचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे तसेच अनेक वन्यजिवांची यामुळे प्राणहानी झालेली असून ब्लास्टींगमुळे अनेक पशुपक्षी मृत होत आहे. त्यामुळे वन्यजिवांचा वावर कमी झालेला आहे. सदरचे खडीफ्रेशर तीन वर्षांपासून सुरु असुन संबंधीत एम. ए. यादव कनस्ट्रक्शन कंपनीस वेळोवेळी विनंती करून सदर बाबीचा खुलासा करून देखील त्यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहे.
तरी वरील कारणांचा विचार करता मौजे खुर्द ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांची आपणास विनंती करण्यात करण्यात येते की, संबंधीत एस.ए.यादव कंपनीचे काम त्वरीत थांबविण्यात यावे व संभाव्य दुष्काळ सदृष्य परिस्थितीत सर्व ग्रामस्थ शेतक-यांना न्याय द्यावा असे म्हटले आहे. निवेदनावर प्रभारी सरपंच संजय आहेर, नानासाहेब आहेर, बेबीबाई कदम, वैशाली आहेर, मनिषा आहेर, लता आहेर, सरस्वती लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.