नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार नाशिक, निफाड, देवळा, त्रिंबक, कळवण, दिंडोरी पेठ, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, मालेगाव, बागलाण, येवला, चांदवड, सुरगाणा यांना ई हक्क प्रणाली
वापर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण नाशिक जिल्हयात ई हक्क प्रणाली वापर सुरु करणेबाबत मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी निर्देश दिले असून त्यानुसार दि.०१.०८.२०२३ पासून नाशिक जिल्हयात ऑफलाईन अर्ज स्विकारणे बंद करण्यात येणार असून केवळ ई-हक्क प्रणालीद्वारेच (ऑनलाईन) अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने शेतकरी वारस नोंद, मयत व्यक्तिचे नाव कमी करणे. अ.पा.क. कमी करणे. एकूम, संगणकीकृत ७/१२ मधिल चुक दुरुस्ती इ. अनोंदणीकृत कामकाजासाठी ई-सेवा केंद्र/सेतू सुविधा केंद्रामार्फत अर्ज करावे लागणार आहे. त्याकरीता सदर अर्ज करणेकरीता शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे.
र अर्जाची नोंदणीकामी प्रती अर्ज रु.५०/- इतके निर्धारित शुल्क याद्वारे निश्चित करण्यात आले आहे. सदर बाबत नाशिक जिल्हयातील सर्व ई-सेवा केंद्र / सेतू सुविधा केंद्र संचालक व आपले सरकार केंद्र यांना आपले मार्फत निर्देश देण्यात यावेत असे ही आदेशात म्हटले आहे.









