मनमाड-येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 20/8/2023 रोजी प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन पुरस्कृत व झेवियर्स क्लब व सेंट झेवियर्स हाई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बास्केटबॉल पंच शिबिराचे ( Referee Clinic ) चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरकरिता राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक व नाशिक जिल्हा अमेचेर बास्केटबॉल संघटनेचे सचिव राजेश क्षत्रिय सर यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्याप.- फा. माल्कम नाथो यांनी केले. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रशिक्षक क्षत्रिय सरांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्पगूच देऊन सत्कार करण्यात आला.
यशिबिरात त्यांनी बास्केटबॉल मधील विविध कौशल्य, पंचांची कर्तव्य, पंचांची मैदानावरील हालचाल, विविध फाऊल चे सिग्नल्स कश्याप्रकारे द्यावे, पंचांचे निर्णय कश्याप्रकारे असावे, याबद्दल उत्कृष्टपणे माहिती दिली. बास्केटबॉल खेळाडू साठी त्यांनी बास्केटबॉल चा इतिहास बास्केटबॉल मधील Fundamental Skills व विविध प्रकरचे कौशल्य व ती कशी आत्मसात करावी या बद्दल उत्कृष्ट अशी माहिती दिली. त्याचप्रमाणे स्कोरशीट कशी भरावी, पंचांची काय काय कामे आहेत याबद्दल माहिती दिली. सकाळच्या 2:30 तासाच्या सत्रामध्ये विविध माहिती देऊन खेळाडूंच्या व पंचांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर योग्य ते उत्तरे दिली. साधारणपणे 45-50 खेळाडूंचे उपस्थिती लाभली.
दुपारच्या सत्रामध्ये प्रत्यक्ष मैदानात जाऊन त्यांनी खेळाडूंना विविध फाऊलस चे प्रात्यक्षिक दाखवून पंचांचे निर्णय कश्याप्रकारे असावे ते सांगितले. तसेच बास्केटबॉल खेळाडूंना विविध Dribllings , Rebounding, Passing , Defence, Offence चे कौशालच्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यक्रमासाठी काही पालक उपस्थित होते. त्यांपैकी जाधव सर यांनी हा उपक्रम राबवल्या बद्दल झेवियर्स क्लब व सेंट Xavier’s हाई स्कूल यांना धन्यवाद दिले. त्याच प्रमाणे राष्ट्रीय प्रशिक्षक व सचिव यांनी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .


यशिबिराचे आयोजन झेवियर्स सपोर्ट क्लब चे दिवाकर दोंदे सर , सुधाकर कातकडे सर, तेजस अमोलिक सर, लक्ष्मीकांत दरवडे, महेश पाथरकर, रीसंम परविंदर सिंह सर क्रीडा शिक्षक (Good Shepard school Manmad) , कृष्णा माळी, करण गरुड , सिमोन स्वामी यांनी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या शिबिराचे प्रायोजकत्व प्रायन्सी मेमोरियल फाउंडेशन,पुणे यांच्या तर्फे तेजस अमोलीक यांनी स्वीकारले होते.









