loader image

नांदगाव ग्रामीण भागात मटका जोरात वडाळी येथून एकास अटक

Aug 25, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

गेल्या अनेक दिवसांपासून  शहरासह ग्रामीण भागात कल्याण मटका सर्रास सुरु असताना नांदगाव पोलिसांनी मटक्यावर छापा टाकून या  ठिकाणाहून एकाला ताब्यात घेवुन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

नांदगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु असल्याचे सिद्ध झाले हे मात्र निश्चित आहे.तालुक्यातील अनेक ठिकाणी मटका, जुगार सुरू असल्याची चर्चा आहे.तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील एका आडोशाला मटका सुरू असल्याची खबर मिळताच नांदगाव पोलिसांनी छापा टाकला असता त्यामध्ये मटकाचे साहित्य व मुद्देमाल २३५१० रुपये जप्त करण्यात आले असून बापु लझ्मण शेळके रा.वडाळी बुद्रुक यास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पो.हवा.दिपक मुढे यांनी तक्रार दाखल करून पोलीस निरीक्षक प्रतिम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज वाघमारे, पो.ह.अनिल शेरेकर,आदींनी कारवाई केली आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.