नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व विद्यार्थी त्यांचे आवडते कार्टून्स, फळे,राष्ट्रीय महापुरुष तसेच विविध सामाजिक संदेश देणाऱ्या अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी आपापल्या पात्रांविषयी परिचय करून दिला. चिमुकल्यांच्या बोलण्यात व हालचालींमध्ये आत्मविश्वास व उत्साह दिसून आला. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून मायरा फोफलिया, ॠतूजा धूत , वैशाली सोनवणे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चव्हाण आणि रसिका मिडतिया या विद्यार्थिनींनी केले. संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूलचे प्राचार्य श्री मनी चावला सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुवर्णा अव्हाड यांनी सर्वसहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व पालकांचे आभार मानले.











