नांदगांव तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नांदगांव तालुक्यात हवा तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगांव तालुक्यात
दुष्काळाची गंभिर स्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकरी, नागरीक, कामगार व इतर घटकांना याचा
खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मुख्यतः शेतकऱ्यांचे यामध्ये खुप मोठे नुकसान झालेले आहे व होत आहे. तरी
या बाबींचा विचार करता नांदगांव तालुक्यात त्वरीत दुष्काळ जाहिर करावा अशी शासनाकडे त्वरीत मागणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार मोरेंकडे करण्यात आली आहे.
तसेच तालुक्यातील शेतकरी, नागरीक, कामगार व इतर घटकाचे विविध मागण्या देखिल लवकरात
लवकर पूर्ण करणेकामी शासन स्तरावरून योग्यती कार्यवाही करावी व याबाबत शासनास अवगत करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळाचे गंभिर समस्येमुळे शेतकऱ्यांनी पेरलेले पिक येऊ शकलेले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसाणीची नुकसान भरपाई मिळावी.
अनेक गावांमध्ये पिण्याचे पाण्याची गंभिर समस्या उद्भवत आहे, त्या गावांना तात्काळ टैंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा.
दुष्काळामुळे जनावरांचे देखिल चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जनावरांसाठी तालुक्यात ठिक-ठिकाणी चारा छावण्या सुरु करणेत याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.










