loader image

शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

Aug 26, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात वाढ करावी महिलांना सुरक्षिता द्यावी विमा संरक्षण द्यावे यासह शिपाई पदावर नियुक्ती द्यावी या मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी राज्याचे हेविवेट नेते अन्न पुरवठामंत्री नामदार छगन भुजबळ यांची येवला येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देऊन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली यावेळी नामदार भुजबळ यांनी हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे यासाठी मी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करेल असे सकारात्मक उत्तर दिले यावेळीं महिलांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी संगीता संतोष सोनवणे,आशा शरद काकळीज,अलका आयनोर ,रत्ना सोनवणे, संगीता मोकळ आदी महिला उपस्थित होत्या .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.