मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विजय (आप्पा) करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मा. कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती पित्यर्थ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे शिक्षकेतर कर्मचारी जावीद मुश्ताक शेख (सर) यांना नाशिक जिल्हास्तरीय 2023 उपक्रमशील शिक्षकेतर पुरस्कार म.वि.प्र.समाज संस्थेचे सरचिटणीस ऍड.नितीनभाऊ ठाकरे व माजी पालकमंत्री श्री.बबनराव घोलप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला. या वेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, मा.पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिवसेना उपनेते अद्वय हिरे, शिवसेना नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मा.शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते व शिक्षण तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड संस्थेच्या संचालिका आयशा मो.सलीम गाजियानी, मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एम.पी.एल.क्रिकेट ग्रुप, मनमाड तर्फे जावीद शेख यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...







