loader image

दरेगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरिनाम सप्ताह
(महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कितने)

Aug 30, 2023



दरेगाव (गोरक्षनाथ लाड) – नाशिकसह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान असलेल्या चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे कानिफनाथ महाराज (विश्राम मढी ) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात गोकुळ अष्टमी (श्रीकृष्ण जयंती) निमित्ताने गुरूवार दि.३१ ऑगस्ट ते दि.७ सप्टेंबर २५ वे रौप्य महोत्सव श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.
श्रीकृष्ण जयंती (गोपालकाला) या निमित्ताने दि.३१ ऑगस्ट रोजी ब्रम्हमुहर्तावर साधुसंताच्या व मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ यांच्या हस्ते वीणा पुजन करून सप्ताहास प्रारंभ होईल. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२ ते २ गाथा भजन,४ ते ५ प्रवचन,५ ते ६ सामुदायिक हरिपाठ,तसेच रात्री ९ ते ११ हरिकीर्तन नंतर आलेले भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
या सप्ताहात रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने होईल.(दि.३१) रोजी बाळु महाराज गिरगांवकर,(दि.१) रोजी एकनाथ महाराज चत्तरशास्त्री,(दि.२) रोजी पुरुषोत्तम महाराज पाटील,(दि.३) रोजी भरत महाराज जोगी,(दि.४) रोजी संजय महाराज पाचपोर,(दि.५) रोजी रामराव महाराज ढोक,(दि.६) रोजी अनिल महाराज पाटील,तसेच (दि.६) रोजी रात्री ८ ते ९ या वेळेस गुरूवर्य श्री नवनाथाचार्य महंत गुरूवर्य कृष्णाजी अंभ्यकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होईल. गुरूवार (दि.७) रोजी गोपालकाला या दिवशी सकाळी ८ ते १० योगी दत्तानाथ महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सामुदायिक महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन श्रवणचा लाभ घ्यावा.अशी माहिती समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तसेच नाथकृपा भक्त परिवार यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
.