मनमाड मधील सुप्रसिद्ध सिद्धी क्लासेस च्या संचालिका सौ. भाग्यश्री भागवत दराडे यांना महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटना नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणारा एक्सलन्स इन कोचिंग हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पाच सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी आमदार डॉ. सत्यजित तांबे सर (पदवीधर मतदार संघ नाशिक विभाग), प्राध्यापक दिलीप फडके सर (अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय नाशिक ),डॉ. रवींद्र सपकाळ सर (चेअरमन सपकाळ नॉलेज हब), तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत मुळे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे .
या पुरस्काराबद्दल सौ दराडे मॅडम व क्लासेसच्या सर्व शिक्षकांचे ,तसेच संचालक डॉ.भागवत दराडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

संत झेवियर हायस्कूल शाळेचा दहावीचा निकाल 98.30%
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षेचा निकाल एकूण विद्यार्थी 177 पास 174 शाळेचा एकूण निकाल...