loader image

सप्टेंबर पासून हे झाले आहेत बदल – जाणून घ्या

Sep 2, 2023


प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर २०२३ देखील अनेक बदल घेऊन आला आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाक घरापासून ते शेअर बाजारातील गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होणार आहे. यासोबतच नोकरदार वर्गाला मोठा बदल दिसून येईल तो म्हणजे त्यांच्या टेक होम पगारात वाढ होईल. एवढेच नाही तर देशातील अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर महिना ही अंतिम मुदत आहे. जाणून घेऊया १ सप्टेंबर पासून देशात काय बदल होणार…
व्यावसायिक LPG सिलिंडर झाला स्वस्त
देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमती सुधारित करतात. अशा परिस्थितीत, १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १५० रूपांनी कपात जाहीर करण्यात आली आहे. अशा स्थितीत घरगुती एलपीजी ग्राहकांसोबत व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे.कंपन्यांकडून मोफत भाड्याच्या घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १ सप्टेंबर ही तारीख अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आयकर विभाग भाडेमुक्त निवासाच्या नियमात बदल होणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता अधिक बचत करता येईल आणि त्यांचा इन हॅन्ड पगारही वाढेल.ॲक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला दिवस धक्का घेऊन आला आहे. १ सप्टेंबरपासून बँक विशेष सवलत देणार असून नवीन क्रेडिट कार्डधारकांनाही शुल्क भरावे लागेल, अशी ॲक्सिस बँकेने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली.१ सप्टेंबरपासून IPO लिस्टिंगची अंतिम मुदत T+6 वरून T+3 करण्यात आली आहे. मात्र, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत कंपन्यांना नवीन कालावधीचा अवलंब करायचा की जुनेच नियम अवलंबायचे यावर अवलंबून असेल. १ डिसेंबर किंवा त्यानंतर येणार्‍या सर्व आयपीओला T+3 फॉर्म्युला फॉलो करावा लागणार असेल.UIDAI कडून मोफत आधार अपडेट करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही My आधार पोर्टलवर तुमच्या आधारकार्डचा तपशील कोणतेही शुल्क न भरता मोफत अपडेट करू शकता. मात्र या तारखेनंतर त्यावर ५० रुपये शुल्क आकारले जाईल.तुमच्याकडे अजूनही दोन हजार रुपयांची नोट असेल तर तुम्ही ती लवकर बदलून घ्या कारण ३० सप्टेंबरनंतर तुम्ही ती बदली किंवा बँकेत जमा करू शकणार नाही.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.