जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याचा आज मनमाड शहरातील एकात्मता चौकात निषेध करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील अंतरवली या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांवर जालना पोलीस विभागाने बळाचा वापर करुन लाठीचार्ज व हवेत गोळीबार केला तसेच सदर ठिकाणी असलेल्या लहान मुले व महिलांवर लाठीचार्ज करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असून याचा मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध केला जात आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यानी सदर घटनेची नैतीक जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्याची मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून सदर आंदोलन शांततेने सूरु होते. मात्र गुरुवारी पोलीसांनी आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीचार्ज केला त्यामध्ये अनेकजण गंभीर झाले.
शांततेच्या मार्गाने
सुरु असलेला लढा दडपशाही पध्दतीने चिरडून टाकण्यासाठी पोलीस विभागातर्फे करण्यात आलेली सदर अमानुष लाठीचार्जची घटना संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत निंदनीय आहे. ह्या घटनेचा मनमाड शहर शिवसेना उ बा ठा गटातर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









