loader image

अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई ए सी बी च्या जाळ्यात

Sep 4, 2023


लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अभोणा येथील पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे (३९) व पोलिस शिपाई कुमार गोविंद जाधव (४२) हे १० हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या घटनेत दोघांनी लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ही गोष्ट सांगितल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यात लाच घेतांना शिपाई जाधव हे रंगेहाथ सापडले.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे विरुद्ध अभोणा पोलीस स्टेशन येथे असलेल्या तक्रार अर्ज चौकशी मध्ये गुन्हा दाखल न करण्याचे मोबादल्यात सहायक पोलीस निरीक्षक शिंदे व शिपाई जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे तड़जोडीअंती १० हजाराची लाचेची मागणी केली. त्यानंतर शिपाई जाधव यांनी अभोणा पोलीस स्टेशन येथे ती स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगहाथ पकडले. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष
*आलोसे-
1) नितिन जगनाथ शिंदे, वय – 39वर्ष , सहायक पोलीस निरीक्षक,
नेमणुक-अभोणा पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, राहणार – सावली निवास, गणेश नगर, अभोणा, ता.- कळवण, जि.- नाशिक
2) कुमार गोविंद जाधव,वय- 42 वर्ष,पोलीस शिपाई बककल नंबर 625,
नेमणुक – अभोणा पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, राहणार- रूम नं.07, अभोणा पोलीस स्टेशन वसाहत, अभोणा,ता.- कळवण, जि.- नाशिक

*लाचेची मागणी रक्कम व दिनांक *- 10,000/- रूपये दिनांक 02/09/2023
*लाच स्वीकारली रक्कम व दिनांक *- 10,000/- रूपये दिनांक-03/09/2023
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे विरुद्ध अभोणा पोलीस स्टेशन येथे असलेल्या तक्रार अर्ज चौकशी मधे गुन्हा दाखल न करण्याचे मोबादल्यात आलोसे क्र 01 व 02 यांनी तक्रारदार यांचेकडे तड़जोडीअंती 10,000/- रु. लाचेची मागणी करुण आलोसे क्र.02 यांनी आभोणा पोलीस स्टेशन येथे स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकड़ण्यात आले म्हणून गुन्हा.

*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :- विशेष पोलीस महानिरीक्षक, नासिक परिक्षत्र, नासिक
*सापळा अधिकारी
श्रीमती निलिमा डोळस ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक-
पो. हवा. पंकज पळशिकर
पो. ना. नितीन कराड,
पो.शि.सुरेश चव्हाण
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.