loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.

Sep 5, 2023


 

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उर्दू व मराठी माध्यमातील इ.१० वी ते इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमिका साकारून शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे अध्यापन केले. व त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक जीवनपटावर शिक्षक झालेले विद्यार्थ्याचे व शाळेतील शिक्षकांचे भाषणे झाली. तसेच शाळेतील शिक्षकांतर्फे शिक्षकांची भुमिका बजावणारे सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. भुषण शेवाळे सर, संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर,शेख आरीफ कासम व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांतर्फे गुलाबपुष्प व शालेय वस्तु भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्याने केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे भुषण दशरथ सर, संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले.


अजून बातम्या वाचा..

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.