डायलिसिस रुग्ण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी शिफारस केलेल्या व्यक्तींना आरोग्य साक्षर करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
प्रतिनिधी : सध्या उपचार घेत असलेल्या डायलिसिस रुग्णांना आणि किडनी प्रत्यारोपणासाठी शिफारस केलेल्या व्यक्तींना महत्वाची माहिती आणि सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे मोफत कार्यशाळेंचे आयोजन करण्यात आले आहे. हि कार्यशाळा दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी नाशिकच्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सभागृहात दुपारी 3:00 वाजता होणार आहे.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार बाबत सखोल माहिती आणि मार्गदर्शन तसेच किडनी प्रत्यारोपणानंतरची काळजी आणि जीवनशैलीतील बदलांबद्दल माहिती देऊन सक्षम करणे आहे. ज्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले होऊ शकते.
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ञ डॉ विपुल गट्टाणी व मूत्र विकार तज्ञ डॉ श्याम तलरेजा हे मार्गदर्शन करणार आहेत. डायलिसिस उपचारातील नवीनतम प्रगती, किडनी प्रत्यारोपणाची तयारी, प्रत्यारोपणाची प्रक्रिया समजून घेणे,प्रत्यारोपणानंतरची काळजी आणि रिकव्हरी.किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल. अशा विविध विषयावर या कार्यशाळेत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे
ही कार्यशाळा सर्व डायलिसिस रुग्ण, किडनी प्रत्यारोपणासाठी शिफारस केलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि किडनीच्या आरोग्याविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी खुली आहे. उपस्थितांना प्रश्न विचारण्याची आणि तज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची हि अनोखी संधी आहे.
प्रवेश विनामूल्य आहे, परंतु मर्यादित आसनांमुळे नोंदणी आवश्यक आहे. तुमची जागा आरक्षित करण्यासाठी, कृपया समन्वयक ८६६९९५५४५४ वर संपर्क साधावा. असे आव्हान अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे











