loader image

मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समाजात आपला स्टेटस निर्माण करावा : श्रीमती विजया हंडोरे

Sep 5, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनानिमित्त महिला विकास कक्ष व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती विजया हंडोरे यांचे शिक्षण व शिक्षक या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक विद्यार्थ्यांना विधायक मार्गाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात तसेच संपर्क माध्यमांचा वापर विधायक कार्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले विद्यार्थ्यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा समाजात आपला स्टेटस निर्माण करावा असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या क्षमता ओळखून शिक्षणामध्ये वाटचाल केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी मित्रांचे मूल्यमापन करूनच भविष्याची वाटचाल केली पाहिजे, विद्यार्थ्यांनी कुटुंबाप्रती आपली जबाबदारी व समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ.जे. वाय.इंगळे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. आर.डी.भोसले तसेच वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मिलिंद अहिरे सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कविता काखंडकी यांनी केले,सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. विष्णू राठोड यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. आरती छाजेड यांनी मानाले.


अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
.