नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव शहरातील मेहतर वाल्मिकी
समाजाच्या वतीने प्रथमच गोगा जन्मोत्सव सोहळा तसेच श्री. गोगाजी महाराज निशाण सोहळा मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यावेळी समाज बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गोगा महाराज जन्मोत्सव सोहळा तथा निशाण मिरवणूक सोहळा शहरातील मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रथमच साजरा करण्यात आला. यावेळी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास गोगाजी महाराज निशाण मिरवणूक जल्लोषात वाजत गाजत काढण्यात आली. भाविकांचे श्रध्दा असलेलं शिवपार्वतीचे प्रतिकृती असलेले भव्य निशान सर्वांना
आकर्षित करत होते. सुमारे पंचवीस फुट उंच मोरपिसांनी चारही बाजूंनी गुंफलेलं शंकर, पार्वती तसेच हातातील त्रिशूळ असलेलं निशान मिरवणुकीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते.
मिरवणूक सोहळ्यात मोठया संख्येने समाज बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. कैलास नगर येथे रुपसिंग जयसिंग फुलारे ( जय भोले) यांच्या निवासस्थानी जाऊन महाआरती करुन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.










